शेळ्या चारायला गेलेल्या व्यक्तीवर वाघाचा हल्ला; व्यक्तीचा जागीच मृत्यू

ब्रम्हपुरी वनविभागातील (Bramhapuri forest division) तळोधी वनपरिक्षेत्रात (Talodhi forest reserve) वाघाने केलेल्या हल्ल्यात (tiger attack) एक जण ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली.

    चंद्रपूर (Chandrapur). ब्रम्हपुरी वनविभागातील (Bramhapuri forest division) तळोधी वनपरिक्षेत्रात (Talodhi forest reserve) वाघाने केलेल्या हल्ल्यात (tiger attack) एक जण ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. खाटूजी भानू कुमरे (७०), असे मृताचे नाव आहे.

    गंगासागर हेटी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ६९१मध्ये कुमरे हे शेळ्यांना चराईसाठी घेऊन गेले होते. वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मृताच्या नातेवाइकांना तातडीची मदत देण्यात आली. या घटनेनंतर परिसरात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    दरम्यान, या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या २३वर पोहचली आहे. यातील २० हल्ले वाघाने तर दोन हल्ले बिबट्याने, तर एक हल्ला हत्तीने केला आहे. मागील वर्षात वन्यजीव हल्ल्यात ठार झाल्याच्या जिल्ह्यात एकूण ३१ घटना घडल्या आहेत.