अट्टल दुचाकी चोराला पोलिसांनी केली अटक; चंद्रपूर शहर पोलिसांची कारवाई

राजू गुरनुले यांनी रामनगर पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता शहरातील अष्टभुजा परिसरात राहणाऱ्या जोगी शिवकुमार साहू या संशयित आरोपीला अटक करून विचारपूस केली. अटकेतील आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

    चंद्रपूर (Chandrapur).  दुचाकी चोरट्याला २४ तासात रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून चोरीतील चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जोगी शिवकुमार साहू असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. चंद्रपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घडत आहे. यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

    अशातच चंद्रपूर शहरातील नागिनबाग परिसर येथे राहणाऱ्या राजू गुरनुले हे आपली दुचाकी चंद्रपूर शहरातील गॅरेजमध्ये दुरुस्त करण्यासाठी आले होते. काही वेळाने त्या ठिकाणी जाऊन बघितले असता दुचाकी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

    याबाबत राजू गुरनुले यांनी रामनगर पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता शहरातील अष्टभुजा परिसरात राहणाऱ्या जोगी शिवकुमार साहू या संशयित आरोपीला अटक करून विचारपूस केली. अटकेतील आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

    यावेळी पोलिसांनी चोरीतील चार दुचाकी सह १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात रामनगरचे पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक एकरे, मलिक, रजनीकांत पुठ्ठावर आदींनी केली आहे.