शहरविकास संकल्पाच्या पाठीशी आहे; आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रेम केले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बल्लारपूर तालुका निर्मितीची प्रतिज्ञा घेतली होती. नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर ती प्रतिज्ञा पूर्ण केली.

    चंद्रपूर (Chandrapur).  बल्लारपूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रेम केले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बल्लारपूर तालुका निर्मितीची प्रतिज्ञा घेतली होती. नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर ती प्रतिज्ञा पूर्ण केली. अनेक नेत्रदीपक विकासकामे केली. आणि सुरूच राहणार.

    आता नगर परिषदेच्या माध्यमातून इमारत बांधकामामुळे पुन्हा विकास भर पडेल, तसेच शहरविकासाच्या प्रत्येक संकल्पाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते इमारत बांधकाम भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते.

    सोहळयाला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, रेणुका दुधे,मुख्याधिकारी विजय सरनाईक, घनश्याम मुलचंदानी , अजय दुबे, काशी सिंह, शिवचंद द्विवेदी, समीर केने, मनीष पांडे, निलेश खरबडे, आशिष देवतळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या शहराच्या विकासासाठी मी शर्थीचे प्रयत्न केले. बल्लारपूर नगर परिषदेच्या माध्यमातून मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक 41 शॉपींग सेंटर सर्वसमावेशक आरक्षण तत्वावर विकसित करून इमारत नगर परिषदेला हस्तांतरीत करण्याची अभिनव संकल्पना राबविण्यात आील आहे. या अभिनव संकल्पनेबाबत नगराध्यक्ष हरीश शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

    आ.मुनगंटीवार म्हणाले की, इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बसस्थानक , राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्मार्ट पोलिस स्टेशन, छठपूजा घाट, मुख्य मार्गाचे सिमेंटीकरण, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मिती, अत्याधुनिक भाजीमार्केट अशी विविध विकासकामे पूर्णत्वात आणली. शहरानजिक देशातील अत्याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून सर्व आवश्यक क्रीडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रिडा संकुल देखील पूर्णत्वास आले आहे.असे सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.