पहिल्याच दिवशी ९९ लोकांचे लसीकरण; कोविड-१९ लसीकरण कक्षाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद

घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस व वेकोलिच्या केंद्रीय राजीव रतन इस्पितळात कोविड 19 लसीकरण कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. दरम्यान सोमवारी पहिल्याच दिवशी या ठिकाणी एकूण 99 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

    घुग्घुस (Ghughhus).  प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस व वेकोलिच्या केंद्रीय राजीव रतन इस्पितळात कोविड 19 लसीकरण कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. दरम्यान सोमवारी पहिल्याच दिवशी या ठिकाणी एकूण 99 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

    या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जिपच्या माजी सभापती नितु चौधरी, माजी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, पंस माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा, नकोडाचे सरपंच किरण बांदुरकर, ऋषि कोवे, विनोद चौधरी, तसेच डॉ. आनंद, डॉ. गुप्ता व अधिपरीचारीका आणि केंद्रीय केंद्रीय राजीव रतन हाँस्पिटलची चमू, डॉ. परमेश्वर वाकदकर, राजीव रतन केंद्रीय इस्पितळाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धीक, आरोग्य सहा. झाडे, आरोग्य सहा. कावळे, पाटील उपस्थित होते.