वाघाच्या जोडीला पर्यटकाने अडविले; वाहनचालकांच्या लागल्या लांबच लांब रांगा; वननियमांचे उल्लंघन केल्याचा युवकावर ठपका

पद्मापूर बफर गेटच्या (the Padmapur buffer gate) आत वाघाच्या जोडीला (A video of a pair of tigers) एका युवकाकडून अडविण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral on social media) घटनेतील युवकाने वाघाचा व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकाॅर्ड करून त्याच्या फेसबूक पेजवर (Facebook page) अपलोड केला.

  चंद्रपूर (Chandrapur).  पद्मापूर बफर गेटच्या (the Padmapur buffer gate) आत वाघाच्या जोडीला (A video of a pair of tigers) एका युवकाकडून अडविण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (viral on social media) घटनेतील युवकाने वाघाचा व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकाॅर्ड करून त्याच्या फेसबूक पेजवर (Facebook page) अपलोड केला. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे (The video has also gone viral) ताडोबा बफर झोन (the Tadoba buffer zone) भागातून प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटकांनी वननियमांचे उल्लंघन केल्याची टीकाही केली जात आहे.

  या जोडीला बघण्यासाठी मोठ्या संख्येत वाहनांच्या रांगा मागे व पुढे लागल्या. यातील एका दुचाकीस्वाराने वाघ जोडीच्या अगदी समोर जात त्यांचे चित्रिकरण सुरु केले. उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याबाबत इशारा दिला.

  मात्र दुचाकीस्वाराने चित्रिकरण सुरूच ठेवले. त्याचे हे धाडस इतरांनी मात्र आपल्या व्हिडिओत कैद केले. अगदी जवळ आलेल्या वाघाला अस्तित्व विसरून चित्रिकरण सुरु ठेवल्याने अखेर वाघाने आपला मोर्चा मुख्य मार्ग सोडून जंगलाकडे वळवला. दुचाकीस्वाराने त्याची दखलही न घेता चित्रिकरण सुरू ठेवले.त्यातून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दुचाकीस्वाराने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्वतःच्या फेसबुक वॉलवर शेअर केला.

  बफर क्षेत्रात अति उत्साहीपणाचा कळस
  अशाप्रकारे दुचाकीस्वार अथवा पर्यटकांनी वाघासोबत धाडस करण्याचा हा पहिलाच प्रसंग नव्हे. याआधीही ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात अशा पद्धतीने अति उत्साहीपणाचे अनेक प्रसंग पर्यटकांच्या सजगतेने उजेडात आले आहेत. त्याबाबत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने कठोर कारवाई देखील केली आहे. काही प्रसंगी जिप्सी अथवा गाईड यांनी प्रसंगावधान न राखल्याने त्यांना तंबी देत काम देखील बंद केले आहे. मात्र आता मुद्दा बफर क्षेत्रातील दुचाकीस्वार अथवा पर्यटकांचा आहे.

  नव्या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये वाघ-मानव संघर्षात तब्बल 20 हून अधिक ग्रामस्थांचा बळी गेला आहे. अशा परिस्थितीत असे धाडस दाखविणे धोक्याचे ठरले असते. उन्हाळ्याचा अंतिम टप्पा असताना जंगलातील नैसर्गिक पाणवठयातील पाणी आटत चालले आहे. आणि म्हणून वन्यजीव अथवा वाघ यांची धाव उत्तम पाणीसाठा असलेल्या तलाव अथवा छोट्या बोड्यांकडे असते. अशा परिस्थितीत वन्यजीवांचा मार्ग रोखून व्हिडिओचे धाडस करणे अंगलट येऊ शकते.

  संपूर्ण प्रकाराची घेतली दखल
  या संपूर्ण प्रकाराची दखल ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने घेतली आहे. या पर्यटक अथवा दुचाकीस्वारावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. चंद्रपूर जिल्हा हा किमान दोनशे वाघ असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात कोणत्याही वन व्याप्त खेड्यातील ग्रामस्थ गेली कित्येक वर्षे वाघासोबत सहजीवन व्यतीत करत आहेत. त्यांनी या सहजीवनाचा बाबतीत स्वतः घालून घेतलेले नियम आणि खबरदारी यामुळेच वाघ वाचला आहे. असे स्वनियमन पर्यटक व इतरांना कधी जमणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अशा चुका टाळण्यासाठी अतिहौशी पर्यटक -दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई मात्र गरजेची आहे, अशी मागणी होत आहे.