viral flue

  • वातावरणातील बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ

सावली. सद्या पावसाळा र्ऋतु सुरु असून या वातावरणात अनेक आजार वर डोके काढत असतात. सद्या संसर्गजन्य आजार उद्भवत असून आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे.वातावरणातील बदलाने अनेकांना सर्दी,खोकला,अंगदुखी सह तापाची लक्षणे जाणवत आहे.

कोरोनाच्या धास्तीने सर्दी खोकला झाला की,अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायला अनेकांना भय वाटू लागले आहे. अनेकजन अशा स्थितीत घरगुती उपाय करून उपचार करीत आहेत. रुग्णालयात गेले तरी प्रकृती खालावते की काय? याची चिंता यामुळे अनेकजन घरगुती उपाय योजनाकडे वळले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण व मृत्युच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशातच वातावरण बदलामुळे विषा्णुजन्य आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकामधे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षी या मौसमामध्ये सर्दी खोकला ताप आदी आजार होत असतात. त्यावर रुग्णालयात जाऊन उपचार सुरू होता. परंतु यावर्षी स्थिती वेगळी आहे.

सद्या शिंका यायला सुरुवात झाली की मनात शंका घर करून बसते. सर्दी खोकला झाला तर भितीत भर पडते.आणि ताप आला तर आपण कुणाच्या संपर्कात आलो तर नाही ना, याचा विचार सुरु होतो. याच कारणाने सर्दी खोकला ताप झाला तर अनेकांच्या अंगावर काटा निर्माण होतो.एकीकडे सोशल मिडियावर कोरोनाचा नीट इलाज होत नसल्याची ओरड आहे त्यामुळे स्वताच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्रशासनाने मास्क वापरने,सामाजिक अंतर राखने सक्तीचे आहे.दंडाची तरतूदही केले आहे तरीपण अनेकजन विनामास्क फिरतांना दिसतात.प्रशासन गांभीर्याने कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न करीत असतांना नागरिक आज अजूनही दुर्लक्ष करीत आहेत असे दिसते.