चंद्रपुरात चढ्या दराने दारुविक्री; मद्यप्रेमींची लूट थांबता थांबेना!

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारूबंदी (the liquor ban in the district) उठविण्यात आल्याने शहरातील अनेक बिअर बार व देशी दारूची दुकाने (beer bars and local liquor shops) सुरू झाली आहेत. दारू दुकाने उघडल्यावर आता निर्धारित मूल्यापेक्षा अधिक दराने मद्यविक्री केली जात असल्याच्या तक्रारीवर उत्पादन शुल्क विभागाला (the excise department) प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    चंद्रपूर (Chandrapur). जिल्ह्यातील दारूबंदी (the liquor ban in the district) उठविण्यात आल्याने शहरातील अनेक बिअर बार व देशी दारूची दुकाने (beer bars and local liquor shops) सुरू झाली आहेत. दारू दुकाने उघडल्यावर आता निर्धारित मूल्यापेक्षा अधिक दराने मद्यविक्री केली जात असल्याच्या तक्रारीवर उत्पादन शुल्क विभागाला (the excise department) प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग मोहीम राबविणार आहे. सदर मोहीम ही बारसाठी नसून देशी दारूची दुकाने, बिअर शॉपी, वाइन शॉप यांच्यासाठी राहणार आहे. दोषी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. यातून ग्राहकांनी लूट (the looting of customers) थांबणार असल्याचा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.

    दुसरीकडे शहरातील अनेक बिअर बार व देशी दारूची दुकाने सुरू झाली आहेत. दारू दुकानांसमोर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होतो. अनेक नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता उद्भवत असलेल्या तसेच भविष्यात उद्भवणार असलेल्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत केली आहे.

    दारूविक्री सुरू झाल्याने अवैध दारूविक्री करणाऱ्या गुंड प्रवृतीच्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. काही अतिउत्साही मद्यप्रेमींमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशांवरही लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे.