शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण काय?; ‘ते’ रहस्यमयी पेंटिंग काय सांगू इच्छिते?

काही दिवसांपूर्वीच शीतल आमटे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. काही तासभरात नंतर चित्रफीत माध्यमातून हटवण्यात आली होती.

  •  कौटूंबीक कलहाचा दुर्देवी अंत

चंद्रपूर. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमचे यांची कन्या व आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अज्ञात आहे.  मात्र, काही दिवसांपासून त्या तणावात होत्या असे सांगितले जाते.  आनंदवनात आमटे कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. येथेच डॉ. शीतल आमटे-करजगी राहतात. महारोगी सेवा समितीच्या सीईओ म्हणून त्या काम बघत होत्या. सोमवारी त्यांनी आपल्याच निवासस्थानी हाताला इंजेक्‍शन टोचले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

केले होते गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वीच शीतल आमटे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. काही तासभरात नंतर चित्रफीत माध्यमातून हटवण्यात आली होती. दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल आमटे-करजगी या सध्या मानसिक ताण व नैराश्‍याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. डॉ. शीतल आमटे यांनीही समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.

‘तो’ कक्ष सील
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नागपुरातून फॉरेन्सिक तज्ज्ञांचे एक पथक वरोरा गेले असून जेथे डॉ. शीतल यांनी आत्महत्या केली तो आनंदवनातील कक्ष सील केला आहे.

रहस्यमय ट्वीट
शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली असून आत्महत्येच्या ९ तासांपूर्वी त्यांनी  कॅनव्हासवरील एक चित्र ट्विट करत ‘वॉर अँड पीस’ अशा शब्दात रहस्यमयी ट्वीट केले होते.  त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

आनंदवनचा वाद
गेल्या अनेक महिन्यांपासून बाबा आमटेंचे आनंदवन चर्चेत आहेत. बाबा आमटे यांनी सुरू केलेले अनेक उपक्रम बंद पडले आहेत, कार्यकर्त्यांचे आरोप प्रत्यारोप, आनंदवनाच्या कारभारात कॉर्पोरेट संस्कृतीचा शिरकाव असे अनेक आरोप आनंदवनात होऊ लागले होते. मात्र, डॉ, शीतल आमटे यांनी वेळोवेळी हे आरोप फेटाळून लावत त्यावर स्पष्टीकरणही दिले होते.