zadipatti rangabhumi

पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला दीडशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. अस्स झाडीच्या मातीतील कलावंतांनी इथल्या रंगभूमीला आपल्या अभिनयाने फुलवून सामाजिक,लावणीप्रधान अशा विविध विषयावरील नाटकांचे सादरीकरण करून समाजप्रबोधनाचे कार्य आजतागायत झाडीपट्टीच्या कलावंतांनी जोपासले आहे. परंतु सध्या मात्र कोरोना संकटाने त्यांन पछाडले आहे.

सिंदेवाही. पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीला दीडशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. अस्स झाडीच्या मातीतील कलावंतांनी इथल्या रंगभूमीला आपल्या अभिनयाने फुलवून सामाजिक,लावणीप्रधान अशा विविध विषयावरील नाटकांचे सादरीकरण करून समाजप्रबोधनाचे कार्य आजतागायत झाडीपट्टीच्या कलावंतांनी जोपासले आहे. परंतु सध्या मात्र कोरोना संकटाने त्यांन पछाडले आहे. ( zadipatti theater artist in crisis)

मागील सात महिन्यापासून रंगभूमीचा ‘पडदाच उघडला नसल्याने जगण्याचा प्रश्‍न निर्माण झालाआहे. सिंदेवाही तालुका खर्‍या अर्थाने कलावंताची खाण असणारा तालुका म्हणून ख्यातीप्राप्त असून झाडीपट्टीचे माहेरघर संबोधले जाते. झाडीपट्टीच्या नाटकांच्या उत्सवाला दिवाळीच्या सणापासून आरंभ होऊन थेट एप्रिल महिन्यापर्यंत नाटकांची रेलचेल सुरू असते.

येथील सर्वसामान्य घरातील प्रतीभा अभिनयाच्या रूपाने बाहेर पडून मनोरंजनासासोबतच प्रभावीपणे समाजप्रबोधनाचे कार्य करते आहे. नाटकातून मिळणाऱ्या मानधनातूनच संसाराचे रहाटगाडे कसेबसे कलावंत पुढे हाकीत असतात. चार-पाच महिन्यांच्या नाट्यप्रयोगाच्या मानधनावर आपला वर्षभराचा उदरनिर्वाह हे कलावंत करीत असतात. परंतु कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आलेल्या संकटकाळात रंगभूमीचा पडदा न उघडण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे मात्र झाडीपट्टी कलावंताची जगण्याची होरपळ होऊन अनेक कलावंतचे जीवन विस्कळीत होताना दिसत आहेत.