सचिन तेंडुलकर बनला सांताक्लॉज ; व्हिडिओच्या माध्यमातून नाताळनिमित्त चाहत्यांसाठी खास गिफ्ट

 

नाताळ २०२०च्या निमित्ताने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सांताक्लॉजच्या रूपात सर्वांच्या भेटीला आला आहे. त्याने त्याच्या चाहत्यांसाठी खास गिफ्ट देखील दिले आहे. दरवर्षी २५ डिसेंबरला हा दिवस जगभरात येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ख्रिसमस हा ख्रिश्चनांचा सर्वात महत्वाचा सण आहे. याच ख्रिसमस २०२० निमित्त मास्टर ब्लास्टरने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने सांता क्लॉजच्या पोशाखातील चाहत्यांना ‘मेरी ख्रिसमस’च्या शुभेच्छा दिल्या.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

काय आहे शुभेच्छा संदेश

“प्रत्येकाला मेरी ख्रिसमस! ख्रिसमस हा नेहमीच एकरूप होण्याचा आणि दातृत्वाचा सण आहे . आपल्या आसपासच्या लोकांसाठी अगदी लहान मार्गांनीही हा सण खास बनवूयात. #ख्रिसमस ,” सचिनने व्हिडिओ सोबत असे कॅप्शन लिहिले आहे . क्रिकेटच्या देवाला सांता क्लॉजकडे बनलेले पाहून अनेकांनी मास्टर-ब्लास्टरच्या लूकचे कौतुक केले तर अनेकांनी त्याला ‘मेरी ख्रिसमस’ शुभेच्छा दिल्या.