कोरोनाने पुन्हा डोकं काढलं वर! गेल्या 24 तासात 2 हजार 151 रुग्णांची नोंद, गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक वाढ

सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, दैनिक सकारात्मकता 1.51 टक्के नोंदवण्यात आली, तर साप्ताहिक सकारात्मकता 1.53 टक्के नोंदवली गेली

देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासात देशात सुमारे 2 हजार 151 कोरोना रुग्णांची नोंद करण्यता आली. एकाच दिवसात नोंदवण्यात आलेली ही कोरोना रुग्णांची वाढ गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक आहे. तर, देशातील सक्रीय रुग्णांचा आकडा 11,903 वर गेला आहे. गेल्या 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला असुन यामध्ये तीन महाराष्ट्रातील एक, एक कर्नाटक आणि तीन केरळमधील रुग्णााचा समावेश आहे. देशातील एकूण मृतांची संख्या 5,30,848 वर पोहोचली आहे.

. कोविड प्रकरणांची एकूण संख्या ४.४७ कोटी (४,४७,०९,६७६) नोंदली गेली.

दरम्यान, कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, केंद्राने राज्यांना सतर्क राहण्यास आणि विषाणूजन्य आजाराच्या व्यवस्थापनासाठी सज्जता सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. एका उच्चस्तरीय बैठकीत, केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना RT-PCR चाचण्यांच्या उच्च प्रमाणात आणि सकारात्मक नमुन्यांच्या संपूर्ण जीनोम अनुक्रमांसह चाचणी वाढवण्यास सांगितले.