कोरोनामुळे देशातील 29 कोटी मुलं शिक्षणापासुन वंचीत, पोषणापासून कमाईपर्यंत भविष्यावर गंभीर परिणाम

भारत हा जगातील एक असा देश आहे जिथे शाळा सर्वात जास्त काळ बंद आहेत. शाळा बंद झाल्यामुळे त्याचा 29 कोटी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यामध्ये 14 कोटी मुली आणि 15 कोटी मुले आहेत. यात सर्वाधिक १३ कोटी मुले माध्यमिक शाळांमध्ये आहेत. भारतातील शाळा गेल्या 18 महिन्यांपासून बंद आहेत. या कालावधीत शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी, डिजिटल डिव्हाईड आणि इतर कारणांमुळे ऑनलाइन वर्गांमध्ये काही त्रुटी आहेत.

    देशात कोरोनामुळे 29 कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. यामध्ये १३ कोटी मुली आहेत. युनेस्कोच्या मते, भारतात कोरोनामुळे शिक्षणापासुन वंचीत असलेल्या मुलींपैकी निम्म्याहून अधिक मुली अजुनही शाळेत परतलेल्या नाहीत. कोरोनामुळे पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील 11 कोटींहून अधिक मुले अजूनही शालेय शिक्षणापासून दूर आहेत. जगातील एकूण विद्यार्थ्यांपैकी हे प्रमाण ७.५% आहे.

    कोरोनामुळे जगभरातील शाळा जवळपास 4.5 महिने बंद होत्या. याचा परिणाम मुलांच्या पोषणावर आणि त्यांच्या भविष्यातील उत्पन्नावर होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च 2020 मध्ये भारतातही शाळा बंद करण्यात आल्या होत्या. भारतातील शाळा गेल्या 18 महिन्यांपासून बंद आहेत. या कालावधीत शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी, डिजिटल डिव्हाईड आणि इतर कारणांमुळे ऑनलाइन वर्गांमध्ये काही त्रुटी आहेत. सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रोटोकॉलसह शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

    भारत हा जगातील एक असा देश आहे जिथे शाळा सर्वात जास्त काळ बंद आहेत. शाळा बंद झाल्यामुळे त्याचा 29 कोटी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. यामध्ये 14 कोटी मुली आणि 15 कोटी मुले आहेत. यात सर्वाधिक १३ कोटी मुले माध्यमिक शाळांमध्ये आहेत.

    भारतात शाळा सोडणाऱ्यांची संख्या अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक आहे. अरुणाचल प्रदेशात शिक्षणापासुन वंचीत विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४.३ टक्के इतके आहे. जे इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हीच विद्यार्थीसंख्या  पंजाबमध्ये सर्वात कमी 1.6 टक्के इतकी आहे. युनेस्कोने जाहिर केलेली ही आकडेवारी 2019-20 या शैक्षणीक वर्षातील आहे.