आता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या दरात झाली वाढ

लसींचे दर जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यात या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रमे 200 आणि 206 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र सरकारसाठी असलेल्या या दरात आता वाढ केली आहे. यापुढे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे 205आणि 215 रुपये सरकारला मोजावे लागणारेत.

    कोरोना (Corona) संकटामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. इंधनदरवाढ, महागाई यांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यातच भर म्हणून आता कोरोना लसींच्या (Vaccines) दरात वाढ करण्यात आली आहे. करोनावर आळा घालण्यासाठी एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. दरम्यान आता या लशींच्या किंमतीत वाढ झाल्याचं समजतंय.

    देशातील कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात आली आहे. मात्र तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका तज्ज्ञांकडून दर्शवण्यात आला आहे. पण आता या लसींच्या किंमती वाढवल्याने सर्वसामान्य माणसाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    लसींचे दर जानेवारी ते जुलै या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. त्यात या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या एका डोससाठी अनुक्रमे 200 आणि 206 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र सरकारसाठी असलेल्या या दरात आता वाढ केली आहे. यापुढे  कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी आता अनुक्रमे 205आणि 215 रुपये सरकारला मोजावे लागणारेत.

    सध्या देशातल्या नागरिकांना तीन प्रकारच्या लशी दिल्या जात आहे. त्यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड (covishield), भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (covaxin) आणि रशियाची स्पुतनिकव्ही या लशींचे डोस देण्यात येत आहे. दरम्यान मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसींना मंजुरी मिळणं अद्याप प्रतिक्षेत आहे.

    Corona vaccination covishield and covaxin vaccine price hike here is the latest rate