नाकातून दिल्या जाणाऱ्या लसीला ‘बूस्टर डोस’ म्हणून मान्यता; खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करणार

भारतातील कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत कोरोनाच्या नवीन प्रकाराशी लढण्यासाठी नवीन योजना बनवण्यावर चर्चा होणार आहे. यासोबतच नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली जाऊ शकतात.

    नवी दिल्ली : कोरोनाच्या नेजल व्हॅक्सिनला (Nasal Vaccine) सरकारने मान्यता दिली आहे. भारत बायोटेकची (Bharat Biotech) नाकातून दिली जाणारी ही लस बूस्टर डोस (Buster Dose) म्हणून वापरली जाणार आहे. ही लस सर्वप्रथम खासगी रुग्णालयांमध्ये (Private Hospitals) उपलब्ध होणार आहे. आजपासूनच याचा कोरोना लसीकरण (Corona Vaccination) कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. याआधी कॉर्बावॅक्सला बूस्टर डोस म्हणून देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    भारतातील कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेत आहेत. या बैठकीत कोरोनाच्या नवीन प्रकाराशी लढण्यासाठी नवीन योजना बनवण्यावर चर्चा होणार आहे. यासोबतच नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली जाऊ शकतात.

    गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १६४ नवे रुग्ण आढळले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन मृत्यू महाराष्ट्रात आणि एक मृत्यू दिल्लीत झाला, उर्वरित ६ मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. भारतात कोरोनाचा वाढता धोका पाहता इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) डॉक्टर अनिल गोयल यांनी गुरुवारी सांगितले की, भारतात लॉकडाऊनची गरज भासणार नाही. आयएमएच्या मते, भारतातील लोकांची प्रतिकारशक्ती चीनपेक्षा अधिक मजबूत आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन होणार नाही.