बकरी ईदनिमित्त करोना नियमांमध्ये सवलती, केरळ सरकार आणि IMA आमने सामने

“देशाचं आणि मानवतेचं भलं व्हावं या मताने तसेच जबाबदारीचं भान राहून आयएमएकडून केरळ सरकारला विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले आदेश मागे घ्यावेत. तसेच त्यांनी कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियर (करोना नियमांसंदर्भातील अंमलबजावणी) न कणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरन्स (दया, माया न दाखवता कारवाई) धोरण स्वीकारावे. केरळ सरकारने राज्य आणि पर्यायाने देश सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या उद्दीष्टांपासून विचलीत होऊ नये,” असं आयएमएने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

    बकरी ईदनिमित्त करोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या अन्यथा या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने केरळ सरकारला दिला आहे.

    मेडिकल असोसिएशनचे म्हणणे आहे की, “बकरी ईदच्या सारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी राज्यात लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.” यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांनी स्थगित केलेल्या चारधाम यात्रा आणि कावड यात्रेचं उदाहरण दिलं आहे.

    “देशाचं आणि मानवतेचं भलं व्हावं या मताने तसेच जबाबदारीचं भान राहून आयएमएकडून केरळ सरकारला विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपले आदेश मागे घ्यावेत. तसेच त्यांनी कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियर (करोना नियमांसंदर्भातील अंमलबजावणी) न कणाऱ्यांविरोधात झिरो टॉलरन्स (दया, माया न दाखवता कारवाई) धोरण स्वीकारावे. केरळ सरकारने राज्य आणि पर्यायाने देश सुरक्षित ठेवण्याच्या आपल्या उद्दीष्टांपासून विचलीत होऊ नये,” असं आयएमएने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

    “केरळ सरकारने नियर्ण रद्द करत कोव्हिड अ‍ॅप्रोप्रिएट बिहेव्हियरचं पालन करण्याला चलना दिली नाही आणि करोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासंदर्भातील उपाय केले नाहीत तर,” सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.

    दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शुक्रवारी करोनासंदर्भातील नवीन नियमांची घोषणा केली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरच नवीन नियमांची घोषणा करण्यात आलीय. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ट्रील लॉकडाउनच्या परिसरातील दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आलीय.