देशातील कोरोना रुग्णांमध्ये घट; गेल्या 24 तासात 3,361 कोरोना रुग्णांची नोंद, सक्रीय रुग्णांची संख्या 33,232

राष्ट्रीय कोविड पॅझिटिव्हीटी रेट 98.73 टक्के नोंदवला गेला आहे. कोरोना रुग्णांचा दैंनदिन पॅाझिटिव्हिटी रेट 2.08 आहे तर, साप्ताहिक पॅाझिटिव्हिटी रेट 2.88 इतका नोंदवण्यात आला आहे

  अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहायला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 3,361 रुग्णांची नोंद करण्यात आली.  सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय प्रकरणे 36,244 वरून 33,232 वर आली आहेत. 

  रुग्णांचा पॅझिटिव्हीटी रेट किती?

  मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या डेटानुसार, राष्ट्रीय कोविड पॅझिटिव्हीटी रेट 98.73 टक्के नोंदवला गेला आहे. कोरोना रुग्णांचा दैंनदिन पॅाझिटिव्हिटी रेट 2.08 आहे तर, साप्ताहिक पॅाझिटिव्हिटी रेट 2.88 इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 6587 जणांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली असुन आतापर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या लोकांची संख्या 4,43,99,415 वर गेली आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.

  मुंबईत किती रुग्ण?

  मुंबईत गुरुवारी कोरोनाच्या 96 रुग्णांची नोंद करण्यात आली. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 11,63,086 वर गेली, तर मृतांची संख्या 19,766 वर गेली आहे. हा सलग चौथा दिवस होता कोरोना रुग्णांची संख्या 100 च्या खाली आल्याच पाहायला मिळाल. बुधवारी 67  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर एकाच मृत्यू झाला होता.