देशात वाढतोय कोरोना! गेल्या 24 तासात 10,093 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 23 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत 807 जणांना कोरोना लस देण्यात आली असुन राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.66 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

    देशात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही वाढणारी रुग्णसंख्या आरोग्य मंत्रालयाची चिंत वाढवणारी ठरतेय. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 10,093  रुग्ण आढळले आहेत. तर, 23 जणांचा मृत्यू झाला आहे.  देशातील एकूण मृतांची संख्या 5,31,114 वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 53,720 वर गेली आहे. शनिवारी 10,753 तर, शुक्रवारी 11,109, गुरुवारी 10,158 रुग्णांची नोंद करण्यात आली आली होती.

    सक्रिय रुग्णांची संख्या 57,542 वर

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 57,542 वर पोहोचली आहे, जी एकूण रुग्णसंख्येच्या 0.13 टक्के आहे. देशात गेल्या 24 तासांत 6,248 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यांत 4,42,29,459 जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज मिळाला आहे, तर  रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.68 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 807 जणांना कोरोना लस देण्यात आली असुन राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.66 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.