देशात वाढतोय कोरोना! गेल्या 24 तासात 1 हजार 890 नव्या रुग्णांची नोंद, 149 दिवसांनंतर मोठ्या प्रमाणावर आढळले रुग्ण

दैनिक पॅझिटिव्हिटी रेट 1.56 टक्के नोंदवण्यात आला असुन पॅझिटिव्हिटी रेट 1.29 टक्के आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.02 टक्के संसर्गाचा समावेश आहे, तर राष्ट्रीय कोविड-19 बरे होण्याचा दर 98.79 टक्के नोंदवला गेला आहे.

नवी दिल्ली: भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा डोके वर काढले आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1,890 रुग्णांची नोंद करण्यात आली. जी गेल्या 149 दिवसांतील सर्वाधिक आहे. तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 8,601 वर पोहोचली असुन सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 9,433 वर पोहोचली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रविवारी दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे देशभरात सात मृत्यू जणांचा मृत्यू झाला असुन देशातीस एकूण मृतांची संख्या 5,30,831 वर पोहोचली आहे. 24 तासांच्या कालावधीत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर केरळमध्ये तीन मृत्यूची नोंद झाली आहे, 

दैनिक पॅझिटिव्हिटी रेट 1.56 टक्के नोंदवण्यात आला असुन पॅझिटिव्हिटी रेट 1.29 टक्के आहे. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.02 टक्के संसर्गाचा समावेश आहे, तर राष्ट्रीय कोविड-19 बरे होण्याचा दर 98.79 टक्के नोंदवला गेला आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,41,63,883 वर पोहोचली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत.