कोविड लसीकरणाबाबत गैरसमज, खालापूर तालुका आरोग्य विभागाची जनजागृती

खालापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधित संख्या ११ हजार ६७२च्या घरात आहे. कोरोना प्रतिबंधक लशीमुळे संसर्ग रोखण्यात यश मिळाले. कोरोना लसीकरणासाठी सर्वत्र झुंबड असायची. सकाळपासूनच रांगा लागायच्या. मात्र, तालुक्यातील काही ठिकाणी, वाडी वस्तीवर लसीकरणाबाबत अद्यापही संभ्रम आणि गैरसमज आहे.

    खोपोली : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने (Corona Vaccination) २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. परंतु, खालापूर (Khalapur) ग्रामीण भाग, वाडी वस्तीवर अद्यापही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत गैरसमज (Misunderstanding) आहेत. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती (Public Awareness) निर्माण व्हावी आणि नागरिकांनी लस घेण्यास पुढे यावे, यासाठी तालुका आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.

    खालापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून १८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकूण बाधित संख्या ११ हजार ६७२च्या घरात आहे. कोरोना प्रतिबंधक लशीमुळे संसर्ग रोखण्यात यश मिळाले. कोरोना लसीकरणासाठी सर्वत्र झुंबड (Swarm) असायची. सकाळपासूनच रांगा लागायच्या. मात्र, तालुक्यातील काही ठिकाणी, वाडी वस्तीवर लसीकरणाबाबत अद्यापही संभ्रम आणि गैरसमज आहे.

    १०० टक्के लसीकरणासाठी प्रयत्न
    प्रशासनाकडून लसीकरण १०० टक्के होण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी जनजागृती मोहीम, लसीकरण वारी आणि १८ वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस सुरू केले आहेत. आतापर्यंत १२ वर्षांवरील एकूण ३ लाख ४० हजार ७५१ जणांनी डोस घेतले आहे. १५ ते १७ वयोगटातील एकूण १३ हजार ६५६ जण लसवंत झाले आहेत. तर १८ वर्षांवरील नागरिकांनी एकूण ३ लाख २९ हजार ५७२ डोस घेतले असून ज्याचे प्रमाण ९१.६० टक्के आहे. प्रशासनाच्या या अथक प्रयत्नांमुळे नागरिक लस घेण्यास पुढे येत आहेत.

    लसीकरण अधिकाधिक होण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. काही ठिकाणी लशीबाबत गैरसमज होते; परंतु आता लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे, असे लोहप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा पाईकराव यांनी सांगितले.