प्रियांका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

प्रियांका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रियांका गांधी आणि सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

    नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची (Covid-19) लागण झाली आहे. प्रियांका गांधी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्या घरीच क्वॉरंटाईन (Home Quarantine) होणार आहेत. तसेच, त्या क्वॉरंटाईनच्या नियमांचे पालन करणार असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

    प्रियांका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी जूनमध्ये प्रियांका गांधी आणि सोनिया गांधींना (Sonia Gandhi) कोरोनाची लागण झाली होती. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. ‘आज कोविड चाचणी (पुन्हा) पॉझिटिव्ह आली. होम आयसोलेशनमध्ये राहणार असून सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करीन’ असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.