महाविद्यालये बंद करण्यासंदर्भात उच्च शिक्षणमंत्र्यानी घेतला आढावा, याबाबच उद्या निर्णय घेणार असल्याची दिली माहिती!

मुंबईतील कोरोनावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी घेतल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली. यावेळी राज्यातील महाविद्यालये सुरु ठेवायचे की नाही याबाबत आढावा घेण्यात आला.

    मुंबई : मुंबई पुण्यात कोरोनासह ओमायक्रोनच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ पाहता मुंबईत शाळा ३१ तारखेपर्यत बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार आहे. त्याच धर्तीवर राज्यातील महाविद्यालयेही बंद ठेवायचे की नाही याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली.  कोविड १९  बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला, विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या सुरक्षिततेबद्दल चर्चा झाली. या संदर्भात उद्या निर्णय जाहीर करू,  असे सामंत यांनी सांगितले.

    मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. या कोरोनावाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी सोमवारी (दि.३) घेतला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ४)  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाईन पार पडली. यावेळी राज्यातील महाविद्यालये सुरु ठेवायचे की नाही याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच कोविड १९ बाबत प्रत्येक जिल्ह्याचाही आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षितते बद्दल चर्चा झाली. या संदर्भात निर्णय उद्या जाहीर करू, असे व्टिट करत सामंत यांनी म्हंटले आहे. परंतु या बैठकीत कुलगुरुंनी महाविद्यालये  बंद करण्यात यावे अशी मागणी देखील केल्याचे समजते.