कोरोनाचं तांडव सुरूच! चीनमध्ये लॉकडाऊनमुळे परिस्थिती बिघडली ; कारखान्यातून चिनी कामगार पळून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. जिनपिंग यांच्या क्रूर शून्य कोविड धोरणामुळे परिस्थिती गंभीर होत आहे.

    तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूने चीनमध्ये थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. जिनपिंग यांच्या क्रूर शून्य कोविड धोरणामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

     

    कोरोना व्हायरस पुन्हा एकदा चीनमध्ये परतला आहे. कोरोनाची सुरुवात चीनमधून झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने चीनमध्ये कहर करायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, प्रशासनाला पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. जिनपिंग यांच्या क्रूर शून्य कोविड धोरणामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. लॉकडाऊनमुळे लोकांसोबत अन्न आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक उपासमारीने त्रस्त आहेत.

     

    लॉकडाऊनमुळे कोविडशी लढा देत असलेल्या झेंगझो प्रांतातील लोकांना सर्वाधिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चीनचा सर्वात मोठा आयफोन कारखानाही याच शहरात आहे. लॉकडाऊनमुळे हजारो कर्मचारी कंपनीत अडकले होते. मात्र आता खाण्यापिण्याची सोय नसल्याने कंपनीच्या भिंतीवर चढून ते पळून जात आहेत. या कामगारांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवत असून त्यांना पायी घरी परतावे लागत आहे.

    कामगार पायी घरी जात आहेत

    भारताप्रमाणेच चीनमध्येही मोठ्या संख्येने मजूर पायीच घराकडे निघाले आहेत. या कारखान्यातून चिनी कामगार पळून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फॉक्सकॉन कारखान्याभोवतीचे कुंपण चढून हे कामगार बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. ते आपले सामान घेऊन शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या घराकडे निघाले आहेत. दुसऱ्या लाटेच्या आधी भारतातही असेच दृश्य पाहायला मिळाले होते.

    कामगार कोरोना पसरवू शकतात

    झेंग्झू येथील फॉक्सकॉनमध्ये सुमारे तीन  लाख लोक काम करतात आणि जगातील निम्मे आयफोन येथे बनतात. लॉकडाऊनमुळे अन्नधान्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. अन्नधान्य नसल्याने येथे गोंधळाचे वातावरण आहे. कामगार आता कंपनीची भिंत चढून घराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे फॉक्सकॉनच्या मोठ्या कारखान्यातून पळून गेलेले हे कामगार देशाच्या इतर भागात कोरोना पसरवू शकतात, अशी भीती चीनला वाटत आहे.