‘वर्क फ्रॉम होम’ ठरतेय आरोग्यसाठी धोकादायक; ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने केले संशोधन

या संदर्भात एक संशोधन करण्यात आले आहे. यात जे लोक कार्यालयीन कामे घरून करतात. अशा हजारो लोकांचा अभ्यास केला गेला. यामध्ये संशोधकांना असे आढळले आहे की, जे लोक दिवसभर एकाच जागी बसून राहतात बिलकुल हालचाली करत नाही. त्यांचा तरुण वयात मृत्यू होण्याची जोखीम वाढत आहे, परंतु जर त्यांनी थोडा व्यायाम ,वा हालचाली केल्या तर हा धोका टाळला जातोय.

मुंबई: कोरोनाच्या विषाणूने जगभर हाहाकार माजवत संपूर्ण जगकाही काळासाठी ठप्प केले होते.लोकांच्या दैनंदिन जीवनमानातही यामुळे मोठा बदल झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काहीकाळ लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे शासकिय,संस्था,नियमशासकीय कार्यालयांनी व खासगी कंपन्याही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉमची सुविधा दिली होती. परंतु वर्क फ्रॉम होमबाबत धक्कादायक माहिती एका संशोधनातून पुढे आली आहे(Work from home). मागील दहा महिन्यापासून घरूनच काम करणाऱ्या लोकांचा यात अभ्यास करण्यात आला. यामुळे सातत्याने एकाच जागेवर बसण्याची सवय लागली आहे. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊन तरुण लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे (increases the risk of death in young people research shows).ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने या संदर्भात महत्त्वपूर्ण खुलासे केले आहेत.

या संदर्भात एक संशोधन करण्यात आले आहे. यात जे लोक कार्यालयीन कामे घरून करतात. अशा हजारो लोकांचा अभ्यास केला गेला. यामध्ये संशोधकांना असे आढळले आहे की, जे लोक दिवसभर एकाच जागी बसून राहतात बिलकुल हालचाली करत नाही. त्यांचा तरुण वयात मृत्यू होण्याची जोखीम वाढत आहे, परंतु जर त्यांनी थोडा व्यायाम ,वा हालचाली केल्या तर हा धोका टाळला जातोय.

५० हजार लोकांवर संशोधन केले

युरोप आणि अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे ५०,००० लोकांवर संशोधकांनी संशोधन केले आणि हे परिणाम दिसून आले. संशोधकांना असे आढळले आहे, की जर लोक अगदी साधा व्यायाम करत असतील किंवा दहा मिनिटे वेगवान चालत असतील तर, दुष्परिणाम बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतात. त्याच वेळी, जे लोक ३५ मिनिटांपेक्षाही जास्त व्यायाम करत असतील तर अशा प्रकारच्या दुष्परिणामांपासून दुर राहतात. म्हणूनच, जर आपण देखील घरून काम करत असाल तर जास्त वेळ एकाच जागी बसण्यापेक्षा हालचाली आणि नियमित व्यायाम करा, जेणेकरून असे दुष्परिणाम होणार नाहीत.