५ व्या कसोटी सामान्यांला ‘या’ दिवसापासून सुरुवात …. पण इंग्लंडच्या संघाला वाटतेय ‘याची’ भीती

पहिले तीन दिवस पावसामुळे खेळात व्यत्यय आला तर इंग्लंडला अखेरच्या दोन दिवसात मॅच जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाला अतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत.

    भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये (India vs England )सुरू असलेल्या कसोटी मालिका सुरु आहे. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर १५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच मालिकेत २-१ ने आघाडी घेतली असून ओव्हलच्या मैदानावर भारताने तब्बल ५० वर्षांनी टेस्ट मॅच जिंकली.

    त्यानंतर भारत आणि इंग्लडमध्ये ५ वी कसोटी मालिका १० सप्टेंबरपासून सुरू होणार असून हा सामना मॅनचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र पाचव्या कसोटीमध्ये पहिले दोन दिवस मॅनचेस्टरमध्ये पावसाचा अंदाज (Manchester Weather) हवामान खात्याने वर्तवला आहे, तर रविवारीही काही काळ पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

     

    पहिले तीन दिवस पावसामुळे खेळात व्यत्यय आला तर इंग्लंडला अखेरच्या दोन दिवसात मॅच जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाला अतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र पावसाच्या शक्यतेमुळे इंग्लंडच्या संघाच्या समोर अडचणनिर्माण झाली आहे.