आयपीएलच्या १३ व्या हंगामातून ७ खेळाडूंची माघार, जाणून घ्या नावे

आतापर्यंत सात खेळाडूंनी विविध कारणावरुन स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे करोडो रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलेल्या फेंचायझीसमोर अडचणी वाढल्या आहेत.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. रविवारी स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. असे आयीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. स्पर्धेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. असे असताना आतापर्यंत सात खेळाडूंनी विविध कारणावरुन स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे करोडो रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलेल्या फेंचायझीसमोर अडचणी वाढल्या आहेत.

या इंग्लंडचा खेळाडू अष्टपैलू बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघात अद्याप जोडला गेलाला नसला तरी तो देखील आयपीएल २०२० न खेळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी स्पर्धेतून नावे मागे घेतली आहेत. चला स्पर्धेतून नावे मागे घेतलेल्या ५ खेळाडू व त्यांची बदली खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

लसिथ मलिंगा – लसिथ मलिंगाचा बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिसनला निवडले आहे.

सुरेश रैना – सुरेश रैनाचा बदली खेळाडू अद्याप सीएसकेने जाहीर केलेला नाही.

ख्रिस वॉक्स – दिल्ली कॅपिटल्सच्या ख्रिस वॉक्स बदली दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एरिच नॉर्जला त्याच्याएवजी निवडले आहे.

हरभजन सिंग – चेन्नई सुपर किंग्जच्या हरभजन सिगच्या बदली सीएसकेने अद्याप कोणता खेळाडू निवडलेला नाही आहे.

जेसन रॉय – जेसन रॉयच्या बदली दिल्ली कॅपिटल्सने डॅनियल सॅम्स ला संधी देण्यात आली आहे.

केन रिचर्डसन – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून केन रिचर्डसनच्या बदली ऍडम झम्पाचा समावेश करण्यात आला आहे.

हॅरी गुर्नी – कोलकता नाईट रायडर्सच्या हॅरी गुर्नीच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूची निवड करण्यात आली नाही.