भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेबाबत फिरकीपटू नॅथन लायन म्हणाला…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या ३ डिसेंबरपासून चार सामन्यांचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. तसेच ही मालिका ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २०१८- २०१९

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या ३ डिसेंबरपासून चार सामन्यांचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. तसेच ही मालिका ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २०१८- २०१९ मध्ये झालेल्या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली २-१ असा विजय मिळवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकीपटू नॅथन लायन याने आपल्या सहकाऱ्यांना अधिक प्रमाणात मेहनत घेण्याचे सुचवले आहे. 

दोन वर्षींपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी खेळण्यात आली होती. त्यामध्ये भारताने आम्हाला आमच्याच मायभूमीत धूळ चारली होती. त्यामुळे भारताविरूद्धची मालिका खेळण्यासाठी यावेळी संपूर्ण संघ उस्तुक आहे. असं नॅथन लायन म्हणाला. किंबहुना दोन्ही मालिकांमध्ये चाहतेही तितकाच उत्साह दाखवतात. त्याचप्रमाणे यावर्षीही हा सामना ऑस्ट्रेलिया संघासाठी मह्त्वाचा भाग ठरणार आहे.