ऐतिहासिक कामगिरी!!! तब्बल५० वर्षानंतर ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने मारली बाजी; ‘हे’ केले रेकॉर्ड

इंग्लडच्या ३६८ धावांची आवश्यकता असताना केवळ २०९ धावांवरच इंग्लंडचा संघ गारद झाला. भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला विजया मिळवून दिला आहे. यासोबतच भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

  ओव्हल: भारतीय क्रिकेट कसोटी संघाने (Indian Cricket Team) इंग्लंडच्या संघाचा १५७ धावांनी जोरदार पराभव करत ओव्हलच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तब्बल ५० वर्षांनंतर भारतीय संघाने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विजयासाठी इंग्लडच्या (England Cricket Team) ३६८ धावांची आवश्यकता असताना केवळ २०९ धावांवरच इंग्लंडचा संघ गारद झाला. भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला विजया मिळवून दिला आहे. यासोबतच भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

  ओव्हलवर भारतीय संघाने मिळवलेल्या विजय हा विविध अर्थांनी खास आहे. भारताने ५० वर्षांनंतर ओव्हलवर कसोटी सामना जिंकला आहे. ५० वर्षांपूर्वी १९७१ मध्ये भारतीय संघाने प्रथमच इंग्लंडमध्ये ओव्हलवर कसोटी जिंकून मालिकादेखील जिंकली होती. भारतीय संघाच्या या विजयाचा देशभर जल्लोष साजरा केला जात आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

  लसीकरणाच्या मोहिमेत आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा महान दिवस. नेहमीप्रमाणेच ‘टीम इंडियाचा’ विजय,” असं पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणाले.

  सचिन तेंडुलकरनेही दिल्या शुभेच्छा

  याबरोबरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही “जबरदस्त पुनरागन. प्रत्येक धक्क्यानंतर सर्वांनी पुनरागमन केलं. अजून पल्ला गाठायचा आहे. ३-१ नं इंग्लंडचा पराभव करूया,” असं म्हणत ट्विटरद्वारे टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

  टीम इंडियाने  केलेत ‘हे’ विक्रम

  – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा हा ३८ विजय आहे.
  – इंग्लंडमध्ये भारताचा हा ९ वा कसोटी विजय होता. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या देशात कसोटी सामने जिंकले आहेत.
  – १९८६ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत दोन सामने जिंकले आहेत. १९८६ मध्ये देखील भारताने कसोटी मालिका जिंकली होती.