तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारताकडून खेळण्यास उताराला ‘हा’ ब्रिटिश खेळाडू ; मजेशीर व्हिडीओ व्हायरल

तिसऱ्या कसोटी सामान्याच्यावेळी ५९ धावांवर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चक्क भारतीय संघातील खेळाडू सारखे कपडे पॅड, हेल्मेट घालून मैदानात उतरली. हा व्यक्ती खेळपट्टीवर येऊन फलंदाजीसाठी तयार होऊ लागला. मात्र या व्यक्तीला पाहून पंचांनी सुरक्षारक्षकांना बोलावले आणि सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून बाहेर नेले

    लीड्स: भारत आणि इंग्लंडच्या संघाच्या चौथ्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या तिसऱ्या सामन्याच्यावेळी घडलेली मजेशीर घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

    तिसऱ्या कसोटी सामान्याच्यावेळी ५९ धावांवर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चक्क भारतीय संघातील खेळाडू सारखे कपडे पॅड, हेल्मेट घालून मैदानात उतरली. हा व्यक्ती खेळपट्टीवर येऊन फलंदाजीसाठी तयार होऊ लागला. मात्र या व्यक्तीला पाहून पंचांनी सुरक्षारक्षकांना बोलावले आणि सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून बाहेर नेले.

    या पूर्वी लॉर्डसवर झालेल्या सामन्यातही जार्वो नावाची जर्सी घालून एक व्यक्ती भारताकडून खेळण्यासाठी मैदानात उताराला होता. ६९ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरताच सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून बाहेर काढले होते.