३५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची भारताला संधी

हेडिंग्ले येथे भारताने १९८६ आणि २००२ मध्ये विजय मिळवला होता. भारत आणि इंग्लंड संघ २००२ नंतर प्रथमच आमनेसामने आले आहेत.

  आजपासून हेडिंग्ले ( Headingley ) येथे भारत आणि इंग्लंड (India Vs England Test Match) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना होत आहे. १-० ने आघाडी घेतलेल्या भारतीय क्रिकेट संघाने हा सामना जिंकला तर ३५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी करेल. १९८६मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा  २-० असा पराभव केला. भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये खेळली गेलेली ही एकमेव कसोटी मालिका आहे ज्यात भारतीय संघाने २ पेक्षा अधिक सामने जिंकले.

  रोहित शर्मा व लोकेश राहुल या सलामी जोडीने या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केलीय. दोघांकडून याच प्रदर्शनाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल.  इंग्लंडमध्ये, टीम इंडियाला सामान्यतः जलद आणि स्विंग गोलंदाजीच्या खेळपट्ट्या उपयोगी पडतात, परंतु हेडिंगलेची खेळपट्टी कोरडी आणि मंद असू शकते. हेडिंग्ले येथे भारताने १९८६ आणि २००२ मध्ये विजय मिळवला होता. भारत आणि इंग्लंड संघ २००२ नंतर प्रथमच आमनेसामने आले आहेत.

  भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, अभिमन्यू ईस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

  इंग्लंड – जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अॅण्डरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम करण, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकीब महमूद, डेव्हिड मलान, व्रेग ओव्हर्टन, ओली पोप, ओली रॉबिनसन.

  आजपासून तिसरी कसोटी

  भारत – इंग्लंड

  लीडस्

  दुपारी ३:३० वाजता