सराव शिबिरासाठी श्रीलंका संघाची घोषणा, पाहा काय आहे ?

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे श्रीलंका क्रिकेट संघ लवकरच सराव शिबिराला सुरूवात करणार आहे. त्यामुले निवड समितीने २४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. २२ जूनपासून कँडी येथे सराव शिबिरास सुरूवात होणार

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे श्रीलंका क्रिकेट संघ लवकरच सराव शिबिराला सुरूवात करणार आहे. त्यामुले निवड समितीने २४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. २२ जूनपासून कँडी येथे सराव शिबिरास सुरूवात होणार आहे. परंतु या संघात टी-२० श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा यांची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकप्रिय फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज लसित मलिंगा या सर्व शिबिराचा भाग नसणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रशिक्षक आणि स्टाफ यांच्या नियंत्रणाखाली पल्लेकले या स्टेडिअमवर हा संघ सराव करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंका संघाचा या महिन्यात होणारा भारताचा दौरा रद्द झाला आहे. त्यासोबतच पुढील महिन्यात बांगलादेश दौरा देखील रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच सराव शिबिरासाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसनंतर सुरू होणाऱ्या क्रिकेट मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ कधीही तयार राहावा. यासाठी हे सराव शिबीर घेण्यात येत आहे. यासोबतच संघातील खेळाडूंच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. असे संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले. सरावासाठी संघ आणि खेळाडूंची निवड सुद्धा करण्यात आली आहे.