माझं नाव क्रिकेटशी जोडणं थांबवा, विराटबाबतच्या गावसकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अनुष्काची नाराजी

पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने ( KL Rahul) वादळी शतकी खेळी करताना (RCB) च्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तसेच आरसीबीचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) एक धाव करून माघारी परतला त्यानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे.

RCB vs KXIP: आयपीएल २०२० च्या १३ व्या हंगामातील सहावा सामना काल गुरुवारी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) या दोन संघामध्ये झाला. यामध्ये पंजाबने आरसीबी संघाचा दारूण पराभव केला आहे. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने ( KL Rahul) वादळी शतकी खेळी करताना (RCB) च्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. तसेच आरसीबीचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) एक धाव करून माघारी परतला त्यानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे.

विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाऊन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली.

अनुष्का शर्माची भली मोठी पोस्ट

पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार का धरलं असावं? असा प्रश्न उपस्थित करताना अनुष्काने म्हटलं आहे की, गेली अनेक वर्ष एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला असेलच, याची मला खात्री आहे. मग, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हालाही तसाच समान आदर मिळायला हवा? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार नक्कीच होता किंवा तुमचं ते विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं का?

हे वर्ष २०२० असून माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही. माझं नाव क्रिकेटमध्ये ओढणं कधी थांबेल आणि अशा कमेंट कधी थांबतील? अशी खंत अनुष्काने व्यक्त केली आहे. शेवटी तिने लिहिलं आहे की, आदरणीय मिस्टर गावसकर, तुम्ही एक महान खेळाडू असून जेंटलमनच्या या खेळात तुमचं नाव नेहमी उंचावर असेल. पण तुम्ही काय बोललात हे कळल्यानंतर मला काय वाटतं ते सांगण्याची इच्छा होती. असे अनुष्का म्हणाली.