मुलगी वामिकासह अनुष्का, विराट वन डेच्या मालिकेसाठी पुण्यात दाखल ; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

उद्यापासून सुरू होणार्‍या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. मालिकेचे सर्व सामने बंद स्टेडियमवर खेळले जाणार आहे. या मालिकेसाठी अहमदाबादहून पुण्याला जात असताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत दिसला.

  पुणे: उद्यापासून(दि २३ मार्च)  सुरू होणार्‍या वन डे मालिकेसाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. मालिकेचे सर्व सामने बंद स्टेडियमवर खेळले जाणार आहे. या मालिकेसाठी अहमदाबादहून पुण्याला जात असताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत दिसला. त्याच वेळी युजवेंद्र चहल-धनश्री आणि हार्दिक पांड्या देखील पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक आणि मुलगा अगस्त्यसमवेत विमानतळावर पोहोचले. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. विराट पुणे विमानतळावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओत विराटाच्या एका हातात कन्या वामिकाचा प्रम आणि दुसर्‍या हातात सामान असलेलं दिसून आले तर अनुष्काने वामिकाला शॉलमध्ये गुंडाळून अलगदपणे आपल्या हातात घेतलेलं दिसून आले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

  कसोटी मालिकेदरम्यान कुटूंबाला राहण्याची परवानगी नव्हती
  यापूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांसह राह्ण्यास परवानगी दिली नव्हती. टी -२० मालिकेदरम्यान बीसीसीआयने यामध्ये सूट दिली होती. अनुष्का आणि वामिका तिसर्‍या टी -२० दरम्यान अहमदाबादला पोहोचल्या होत्या.

  खोलीच्या बाहेरील नावाच्या पाटीने वेधले सर्वांचे लक्ष
  अहमदाबादमधील सर्व खेळाडूंच्या खोलीबाहेर खास नेम प्लेट लावण्यात होत्या. त्यावर खेळाडूंच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे लिहिलेली होती. यावेळी विराटाच्या रूम बाहेर होम स्वीट होमी या नावाखाली वामिका ,अनुष्का,विराट यापद्धतीने पाटी लावण्यात आली होती. नावाच्या पाटीचा फोटोही खूप व्हारायरल झाला होता. भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक देखील पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्य यांच्याबरोबर राहात होता तसेच इतर बरेच खेळाडू आपल्या कुटुंबातील सदस्यांसह हॉटेलमध्ये थांबले होते.