अश्विन ICC ‘प्लेअर ऑफ दि मन्थ’; पंतनंतर ठरला दुसरा क्रिकेटपटू

अश्विनने संपूर्ण मालिकेत 32 विकेट घेतल्या होत्या. तर एक शतक देखील झळकावले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत रुट आणि आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान होते. फक्त या महिन्यात नाही तर गेल्या महिन्यात देखील रूटचे नाव संभाव्या खेळाडूंमध्ये होते तेव्हा पंतने बाजी मारली होती.

    दुबई :  टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने जानेवारी महिन्यातील आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ दी मन्थ पुरस्कारावर आपले नाव कोरल्यानंतर आता भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विन याने फेब्रुवारी महिन्याचा पुरस्कार पटकावला आहे. त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने 2021च्या सुरूवातीला प्रत्येक महिन्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला पुरस्कार देण्याची घोषणा केली होती.

    आयसीसीने मंगळवारी मेन्स प्लेअर ऑफ दी मन्थ विजेत्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा पुरस्कार भारताचा फिरकीपटू आर अश्विनला जाहीर झाला आहे. तर महिलांमध्ये इंग्लंडच्या टॅमी बेमॉन्टने हा पुरस्कार जिंकला आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत आर अश्विनने शानदार कामगिरी केली होती.

    अश्विनने संपूर्ण मालिकेत 32 विकेट घेतल्या होत्या. तर एक शतक देखील झळकावले होते. या पुरस्काराच्या शर्यतीत रुट आणि आयर्लंडचा पॉल स्टीर्लिंग यांचे आव्हान होते. फक्त या महिन्यात नाही तर गेल्या महिन्यात देखील रूटचे नाव संभाव्या खेळाडूंमध्ये होते तेव्हा पंतने बाजी मारली होती.

    फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या ३ कसोटीत अश्विनने 1 शतक आणि 24 विकेट घेतल्या. या मालिकेत त्याने सर्वात वेगाने 400 विकेट घेण्याचा जगातील दुसरा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. मालिकेतील धमाकेदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देखील मिळाला.