इंग्लडमधील  ऐतिहासिक कामगिरीनंतरही BCCI प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहलीवर नाराज ; जाणून घ्या कारण

कोहली आणि शास्त्री यांनी लंडनमधील काही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे बीसीसीआय त्यांच्यावर नाराज आहे. कारण अशाच एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मागील मंगळवारी रवी शास्त्री गेले असता त्यानंतर पाच दिवसांत त्याची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे.

    ओव्हलच्या मैदानावर इंग्लडला मात देत भारतीय क्रिकेट संघाने दमदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर देशभरातून कर्णधार विराट सह संपूर्ण संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र याच वेळी भारतीय किक्रेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi shastri)यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) नाराज आहे.

    बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहली आणि शास्त्री यांनी लंडनमधील काही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे बीसीसीआय त्यांच्यावर नाराज आहे. कारण अशाच एका पुस्तक प्रकाशन(Book publication)  कार्यक्रमाला मागील मंगळवारी रवी शास्त्री गेले असता त्यानंतर पाच दिवसांत त्याची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. त्यांच्या संपर्कात बॉलिंग कोच भरत अरूण, फील्डिंग कोच आर. श्रीधर हे आले असून त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे.सध्या हे सर्वजण विलगीकरणात आहेत.

    या सर्वाबद्दल बीसीसीआय शास्त्री आणि कोहली यांच्याशी बोलणार आहे.  ” इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी (ECB) देखील बीसीसीआय संपर्कात असून अशी कोणतीही घटना परत घडणार नाही यासाठी दोन्ही बोर्ड लक्ष ठेवून आहेत.”