विव्हो कंपनीबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय…

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचा परिणाम हा आयपीएलवर होऊ शकतो. अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत. कारण एकीकडे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भूमिका सामान्य नागरिकांनी घेतली आहे. तर दुसरीकडे सरकारने

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादाचा परिणाम हा आयपीएलवर होऊ शकतो. अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत. कारण एकीकडे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची भूमिका सामान्य नागरिकांनी घेतली आहे. तर दुसरीकडे सरकारने देखील चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द करण्यास सुरूवात केली आहे. तसेच चीनमधील विव्हो कंपनी आयपीएलची संपूर्ण जाहिरात करते. तसेच या कंपनीने २०१८ मध्ये पाच वर्षांसाठी २१९९ कोटी रूपयांचा करार केला होता. त्यामुळे इंडियन प्रिमिअर लीगचं प्रायोजकत्व विव्हो कंपनीकडेच राहणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमाळ यांना याबाबत प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितलं की, विव्हो कंपनीसोबत हा करार आमच्या आधीच्या लोकांनी केला आहे. मी वैयक्तिकरित्या चिनी वस्तूंवर बंदी घालावी या विचारांचा आहे. परंतु कंत्राटं देणं आणि प्रायोजकत्व मिळवणं यात फरक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. चिनी कंपन्या हिंदुस्तानात त्यांची उत्पादने विकतात. मग या कंपन्यांकडून मिळणाऱ्या प्रायोजकत्वाचा पैसा आपण देशाबाहेर का पाठवावा असा धुमाळ यांनी प्रश्न विचारला आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात खेळवता येईल अशी आयोजकांना आशा आहे.