टीम इंडियाच्या दौऱ्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टीम इंडियाला आयपीएलचा टी-२० वर्ल्डकप रद्द करावा लागला. त्यामुळे क्रिकेट संघाला आणि खेळाडूंना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे टीम इंडियाच्या

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे टीम इंडियाला आयपीएलचा टी-२० वर्ल्डकप रद्द करावा लागला. त्यामुळे क्रिकेट संघाला आणि खेळाडूंना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे टीम इंडियाच्या सीरीजची शक्यता कमी असल्याचं चिन्हे पाहायला मिळत आहेत. कारण जून महिन्यात टीम इंडियाचा श्रीलंका दौरा स्थगीत करण्यात आला. श्रीलंकेसोबतच टीम इंडियाचा आता झिम्बाब्वेचा दौराही रद्द करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडिया २४ जूनपासून श्रीलंकेमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० मॅचची सीरिज खेळणार होती. तर २२ ऑगस्टपासून भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू होणार होता. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत असलेल्या संकटामुळे, या अशा परिस्थितीत क्रिकेट खेळणं शक्य नसल्याचं श्रीलंका बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल स्पर्धाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्डकप रद्द झाला, तर त्याऐवजी आयपीएल खेळवली जाऊ शकते, असं बीसीसीआयकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे बीसीसीआय पुढे काय निर्णय घेणार? याकडे सर्व क्रिकेटप्रेमीचं लक्ष लागलं आहे.