दिवाळीपूर्वी बीसीसीआय भारतीय खेळाडूंना करणार मालामाल ; वाढणार ‘इतके’ मानधन

बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने २०१९ मध्ये एका केंद्रीय कराराची घोषणा केली. आता ही घोषणा लागू होण्याची शक्यता आहे.

    दिल्ली: येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या(IPL 2021) सामन्यांना सुरुवात होत आहे. अशातच भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) भारतीय क्रिकेटपटूना मोठे सरप्राईझ भेट देण्याच्या स्थितीत असून, बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंचे वेतन दिवाळीपूर्वी वाढवले जाण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या बीसीसीआय सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत भारतीय क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात सुमारे ४० टक्के वाढ होऊ शकते. तसेच बीसीसीआय राज्य संस्थांच्या सहकार्याने भारतीय क्रिकेटपटूंना केंद्रीय करार देखील देऊ शकतो.

    स्पोर्ट स्टारने दिलेल्या अहवालानुसार, फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे वेतन ५०, ०००रुपयांपर्यंत वाढवले ​​जाऊ शकते. टी-२० मॅचसाठी खेळाडूंना२५,००० रुपये मिळू शकतात. आतापर्यंत खेळाडूंना रणजी ट्रॉफीसाठी प्रतिदिन ३५००० रुपये आणि विजय हजारेमध्ये ३५००० रुपये मॅच फी म्हणून मिळतात. सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रत्येक मॅचसाठी १७,५००पये मिळतात. राखीव खेळाडूंना मॅच फीचे ५० टक्के वेतन मिळते.

    बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने २०१९ मध्ये एका केंद्रीय कराराची घोषणा केली. आता ही घोषणा लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महिला क्रिकेटपटूही मॅच फी वाढीची आशा आहे. सध्या महिला क्रिकेटपटूंना प्रति वनडे१२,५०० रुपये आणि टी- २० साठी ६२५० दिले जातात. महिला खेळाडूंच्या मॅच फीमध्ये २५ ते ४० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर, कोरोनामुळे गेल्या हंगामात रणजी खेळू न शकलेल्या क्रिकेटपटूंनाही मॅच फीची किमान५० टक्के भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील मंजुरी बीसीसीआय सर्वोच्च परिषद देऊ शकते.