कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका ; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू परतला भारतात

पूर्ण सीजनमध्ये कुलदीप यादव खेळण्याची कुठलीही शक्यता नसल्यामुळेच त्याला परत पाठवल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. यादववर मुंबईत शस्त्रक्रिया झाली असून त्याला बरं व्हायला ४ ते ६ महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    मुंबई: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा झटका बसला आहे. केकेआर( KKR) चा डावखुरा स्पीनर कुलदीप यादवच्या गुडघ्याला गंभीर ( Kuldeep Yadav injured and returned to India ) दुखापत झाल्यामुळे तो युएईतून भारतात परत आला आहे. यानंतरच्या रणजी मालिकेतही तो खेळण्याची शक्यता कमी असून या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला काही आठवड्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिस करताना झाली दुखापत आयपीएलच्या आगामी सामन्यांमध्ये तो सहभागी होण्याची कुठलीही शक्यता नसल्यामुळेच त्याला भारतात परत पाठवण्यात आल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रॅक्टिसदरम्यान कुलदीपचा गुडघा मुरगळला आणि त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळेच तो भारतात परतल्याचे सांगण्यात येत आहे.

    पूर्ण सीजनमधून बाहेर इथून पुढच्या पूर्ण सीजनमध्ये कुलदीप यादव खेळण्याची कुठलीही शक्यता नसल्यामुळेच त्याला परत पाठवल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. यादववर मुंबईत शस्त्रक्रिया झाली असून त्याला बरं व्हायला ४ ते ६ महिन्यांचा वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणजी ट्रॉफी खेळण्याची शक्यताही कमी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुडघ्याची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असते. त्यातून बरं व्हायला अनेक दिवसांचा वेळ लागतो.

    सुरुवातीला फिजिओथेरपी, त्यानंतर सौम्य स्वरुपाची प्रॅक्टिस, मग नेट सेशन अशी दीर्घ आणि वेळखाऊ प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे रणजी ट्रॉफीचे सामने सुरु होईपर्यंत कुलदीप या दुखापतीतून बरा होईलच, असे खात्रीशीरपणे सांगता येत नसल्याचं सूत्रांचे म्हणणे आहे.