IPL 2020: चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सनरायझर्स हैदराबादवर  २० धावांनी विजय

दुबई येथे सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या २९ सामन्यात सनरायजर्स चेन्नई विरुद्ध सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने २० धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १६७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाला १४७ धावापर्यंत मजल मारता आली.

प्रथम फलंदाजी करत चेन्नईने १६७ धावा केल्या होत्या. त्यात शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीच्या ८१ धावांच्या भागीदारी केली. १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून केन विल्यमसनने संयमी खेळ करत अर्धशतक (५७) केले, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. हैदराबादच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.