इंग्लंडच्या संतप्त बॉलर्सला चेतेश्वर पुजाराची संयमी प्रतिक्रिया ; video viral

रोहित आणि पुजारा यांच्यामध्ये १५० रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडच्या टीमने नवीन बॉल घेतल्यानंतर लगेचच एकाच ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या.

    भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात ओव्हलवर सुरु असलेल्या चौथ्या टेस्टमध्ये भारताच्या संघातील रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) जोडगोळी भारतीय संघाचे स्थान मजबूत केले. रोहितनं १२७ रन काढले. तर पुजाराने ६१ रनची खेळी केली. या तिसऱ्या सामन्या दरम्यान पुजाराच्या संयमी खेळीने इंग्लंडच्या बॉलर्स चांगलेच त्रस्त झालेले दिसून आले. या रागातूनच इंग्लंडचा फास्ट बॉलर क्रेग ओवरटननं पुजारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याही स्थितीत पुजाराने आपल्या संयमी खेळाचा प्रयत्य दिला. यासगळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    ओवरटननं टाकलेल्या ४९ व्या ओव्हरमध्ये पुजाराने २ फोर लगावले. त्यामुळे तो संतप्त झाला होता. त्यानंतर त्या ओव्हरमधील चौथा बॉलर टाकताना तो चांगलाच नर्वस झाला होता. ओवरटनने तो बॉल अडवला आणि नंतर त्याने पुजाराच्या दिशेनं बॉल उगारला. असं करत त्यानं पुजाराला घाबरवण्याचा प्रयत्न केला. याचा पुजारावर काहीही परिणाम झाला नाही. पण ओवरटन सध्या चांगलाच ट्रोल होत आहे.

    रोहित आणि पुजारा यांच्यामध्ये १५० रनची पार्टनरशीप झाली. इंग्लंडच्या टीमने नवीन बॉल घेतल्यानंतर लगेचच एकाच ओव्हरमध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या. ओली रॉबिनसनने रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराला आऊट केले.