चिनी कंपनीसोबतच्या करारावर पुढील आठवड्यात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक

भारत आणि चीन सैन्यामध्ये सुरू असलेला तणाव हा आयपीएलवर होण्याची शक्यता दिसत आहे. कारण संपूर्ण देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. तसेच सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. परंतु बीसीसीआय

भारत आणि चीन सैन्यामध्ये सुरू असलेला तणाव हा आयपीएलवर होण्याची शक्यता दिसत आहे. कारण संपूर्ण देशभरात चीनविरोधी वातावरण आहे. तसेच सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. परंतु बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच २०१७ पासून विव्हो कंपनी मुख्य स्पॉन्सरशीप करत आहे. त्याचप्रमाणे विव्हो कंपनीने पाच वर्षांसाठी करार केला होता. मात्र आता देशातील अनेक भागांत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात येत आहेत. त्यामुळे देशातील जनभावनेचा आदर करून, चिनी कंपन्यांसोबत करार करायचा की नाही यावर बीसीसीआय विचार विनिमय करणार आहे.

दरम्यान, पुढील आठवड्यात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडणार आहे, त्यामुळे या बैठकीत आयपीएलच्या प्रायोजकत्वाबद्दल विचार करण्यात येईल अशी माहिती आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी सांगितलं की, विव्हो कंपनीसोबत हा करार आमच्या आधीच्या लोकांनी केला आहे. मी वैयक्तिकरित्या चिनी वस्तूंवर बंदी घालावी या विचारांचा आहे. परंतु कंत्राटं देणं आणि प्रायोजकत्व मिळवणं यात फरक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.