क्रिकेट क्षेत्रातील महान गोलंदाज राजिंदर गोएल यांचे वृद्धापकाळाने निधन

क्रिकेट क्षेत्रातील महान गोलंदाज राजिंदर गोएल यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ७७ वर्षांचे होते. तसेच त्यांना सोमवारी क्रिकेटविश्वातून

 क्रिकेट क्षेत्रातील महान गोलंदाज राजिंदर गोएल यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ७७ वर्षांचे होते. तसेच त्यांना सोमवारी क्रिकेटविश्वातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बिशन सिंग बेदी, भागवत चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना आणि एस. वेंकटराघवन हे फिरकीपटू देशाचे प्रतिनिधित्व करत असताना राजिंदर मात्र देशांतर्गत क्रिकेटपुरतेच मर्यादित राहिले. तसेच त्यांनी रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक ६३७ बळींचा विक्रम आजही राजिंदर यांच्या नावावर अबाधित आहे. 

दरम्यान, राजिंदर गोएल यांच्या मृत्यूनंतर अनेक क्रिकेट प्रेमींकडून आणि भारताचे खेळाडूंकडून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. रणजी करंडक स्पर्धेत ६००पेक्षा अधिक बळी मिळवणाऱ्या राजिंदर गोएल यांच्या निधनाची बातमी ऐकू न दु:ख झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,’’ अशा शब्दांत महान फलंदाज सचिन तेंडुलकरने श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनेही दु:ख व्यक्त केले आहेत.