Cricket played the Sanskrit way in Bhopal

भारतात क्रिकेटबद्दलचे वेड साऱ्या जगाला माहीत आहे. परंतु, तुम्ही धोतर-कुडत्यात क्रिकेट खेळताना कधी कुणाला पाहिले आहे का? मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये स्पोर्ट्स वेअर नाही तर धोतर-कुडत्यात क्रिकेट खेळले जात आहे. यासोबतच क्रिकेट सामन्याचे समालोचन हे हिंदी-इंग्रजीत न होता संस्कृत भाषेत करण्यात आले.

भोपाळ : भारतात क्रिकेटबद्दलचे वेड साऱ्या जगाला माहीत आहे. परंतु, तुम्ही धोतर-कुडत्यात क्रिकेट खेळताना कधी कुणाला पाहिले आहे का? मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये स्पोर्ट्स वेअर नाही तर धोतर-कुडत्यात क्रिकेट खेळले जात आहे. यासोबतच क्रिकेट सामन्याचे समालोचन हे हिंदी-इंग्रजीत न होता संस्कृत भाषेत करण्यात आले.

भोपाळमध्ये एक क्रिकेट धम्माल क्रिकेट स्पर्ध रंगली. या स्पर्धेतील प्रत्येक गोष्ट विशेष होती. यास्पर्धेत पंडितांनी सहभाग घेतला होता. हे कुणी प्रोफेशनल खेळाडू नव्हते.

सामने अगदी जोरदार सुरू होते. खेळाचे समालोचन संस्कृत मध्ये सुरू होते. तर खेळाडूही एकमेकांसोबत संस्कृतमध्येच संवाद साधत होते. यासंदर्भात ‘संस्कृती बचाओ मंच’चे चंद्रशेखर तिवारी यांनी सांगितले की, संस्कृत भाषे प्रति लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशाने या अनोख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भोपाळमध्ये कर्मकांड करणाऱ्या पंडितानी यावेळी खेळाचा आनंद घेतला.