क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ‘गुंडा’ स्टाईल कुणाला दिल्या शुभेच्छा ; तुम्हीच पाहा

सेहवागनं ऑस्ट्रेलियाचे महान फास्ट बॉलर डेनिस लिली (Dennis Lillee) यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. लिली आज (१८जुलै) ७२ वर्षांचे झाले आहेत. लिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना त्यांचा वेगळाच दरारा होता.

    मुंबई: भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ताज्या घडामोडी, मॅचचा निकाल किंवा क्रिकेटपटूंचे वाढदिवस या निमित्तानं सेहवाग त्याच्या खास शैलीमध्ये ट्विट करत असतो

    नुकतंच सेहवागनं ऑस्ट्रेलियाचे महान फास्ट बॉलर डेनिस लिली (Dennis Lillee) यांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. लिली आज (१८जुलै) ७२ वर्षांचे झाले आहेत. लिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना त्यांचा वेगळाच दरारा होता. सेहवागनं त्यामुळे त्यांना खास ‘गुंडा’ या हिंदी सिमेमाच्या स्टाईलनं शुभेच्छा दिल्या आहेत.

    गुंडामधील प्रसिद्ध डायलॉगचं रुपांतर सेहवागनं त्याच्या स्टाईलमध्ये करत लिली यांना शुभेच्छा दिल्या आहेत.’नाम है लिली, करता हूं बॅट्समन की पँट गिली. डोन्ट बी सिली. हॅप्पी बर्थडे सर लिली’ या शब्दात सेहवागने लिली यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    ऑस्ट्रेलियाच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ बॉलरमध्ये लिली यांचा समावेश होतो. ते १९७१ ते १९८४ या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या कालावधीमध्ये त्यांनी ७० टेस्टमध्ये ३५५ तर६३ वन-डेमध्ये १५५ विकेट्स घेतल्या आहेत. एका टेस्टमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी त्यांनी ७ वेळा तर एका इनिंगमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी २३ वेळा केली आहे.