IPL 2020 :दिल्ली कॅपिटल्स संघाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर ५९ धावांनी विजय

इंडियन्स प्रीमियर लीगच्या दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ५९ धावांनी मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १९७ धावा बंगळुरुला पूर्ण करण्यात अपयश आले. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या इतर सर्व फलंदाजांनी दिल्लीच्या माऱ्यासमोर शरणागती पत्करली. बंगळुरुचा संघ १३७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.या हंगामात चांगले प्रदर्शन करून दाखवणारा बंगळरूचा संघाला आजच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

दिल्लीकडून खेळताना मार्कस स्टोईनिस ५३ (२६), पृथ्वी शॉ ४२ (२३) आणि रिषभ पंत ३७ (25) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने १९६ धावांचे आव्हान उभे केले. मात्र या हंगामात चांगले प्रदर्शन करून दाखवणाराबंगळरुच्या संघाची आज खराब सुरुवात झाली. सध्या फॉर्ममध्ये असलेले फिंच, डिव्हीलियर्स यांना या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, बंगळरुच्या संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक बाजू लावून धरत दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. त्याने बंगळरु संघाकडून सर्वाधिक ४३ (३९) धावा केल्या आहेत.