भीक्षूच्या पेहरावातील धोनीनं ‘या ‘कारणासाठी रोहित शर्माला लालची तर विराट कोहलीला म्हटले रागीट

धोनी जंगलमध्ये मुलांसोबत भीक्षूच्या रुपात दिसत आहेत. यामध्ये तो रोहित शर्माला ट्रॉफीसाठी लालची म्हणत आहे, तर विराट कोहलीला रागीट म्हणत आहे. मात्र हा लालची पणा करणे चांगले असल्याचे धोनीने म्हटले आहे.

    भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं मुंडण केलेला भीक्षूच्या अवतारात असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे त्याच्या या लुकमागे अनेक तर्कवितर्क लावले गेले. पण, त्यामागचं खरं कारण अखेर समोर आलं आहे. सीएसकेने इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाची ( आयपीएल २१२१ ) तयारी सुरू केली आहे. त्यासाठी धोनी चेन्नईत दाखल झाला असून त्यानं सहकाऱ्यांसोबत सरावाला सुरुवातही केली. यातच धोनीच्या नव्या लूकनं सर्वांना अचंबित केलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by IPL (@iplt20)

    धोनीनं हा लूक आयपीएल २०२१च्या प्रमोशनसाठी बदलला आहे. आयपीएलचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीनं जाहीराती तयार केल्या आहेत. यात धोनी जंगलमध्ये मुलांसोबत दिसत आहे आणि भीक्षूच्या रुपात दिसत आहेत. या जाहीरातींमध्ये तो रोहित शर्माला ट्रॉफीसाठी लालची म्हणत आहे, तर विराट कोहलीला रागीट म्हणत आहे. मात्र हा लालची पणा करणे चांगले असल्याचे धोनीने म्हटले आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by IPL (@iplt20)

    चेन्नई सुपर किंग्स रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन

    लिलावात खरेदी केलेले खेळाडू – मोईन अली ७ कोटी, के गौतम ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ५० लाख, हरिशंकर रेड्डी २० लाख, भगत वर्मा २० लाख, हरि निशांत २० लाख.