आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल साशंकता, बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिली ‘ही’ माहिती

बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे आशिया चषकाचं यजमानपद मिळालेल्या पाकिस्तानने यंदाची स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असं सांगितलं जात आहे.

बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे आशिया चषकाचं यजमानपद मिळालेल्या पाकिस्तानने यंदाची स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम आणि आशिया चषक या स्पर्धा एकाच वेळी होणार असल्यामुळे पुन्हा एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत आशिया चषक खेळणं जमणार नाही. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाने पीएसएलचं आयोजन पुढे ढकलून त्या जागेवर आशिया चषक खेळवला तर योग्य होईल. नाहीतर कोरोनाच्या विषाणूच्या संकटात आशिया चषकाचं आयोजन करणं आणि सामने खेळणं शक्य नाही, असं पाक क्रिकेट बोर्डाच्या सीईओ सांगितलं आहे.   

दरम्यान, आशिया चषकाचं आयोजनाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे पाक क्रिकेट बोर्डाने पीएसएल स्पर्धेचा अंतिम सामना स्थगित केला होता. त्यामुळे हे सामने नोव्हेंबर महिन्यात खेळवण्याच्या विचारात आहे. परंतु दोन्ही क्रिकेट बोर्ड या मुद्द्यावर काय तोडगा काढतात ? हे पाहणं महत्वाचं आहे.