कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे, बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला…

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगभरासह अनेक कंपन्या, कारखाने, आणि खेळांवर झाला आहे. कोरोनामुळे

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बांगलादेशचा श्रीलंका दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग संपूर्ण जगभरासह  अनेक कंपन्या, कारखाने, आणि खेळांवर झाला आहे. कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता, बांगलादेशने क्रिकेट संघाचा प्रस्तावित श्रीलंका दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात श्रीलंकेत बांगलादेशता दौरा होता. या दौऱ्यात बांगलादेश आणि श्रीलंका या दोन संघात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार होती.

परंतु आता कोरोना संसर्गामुळे हा दौरा रद्द करून, तो पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्द वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका रंगणार आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफी मोर्ताझालाही कोरोनाची लागण झाली होती.