आयपीएलपूर्वीच ICC ने विराट कोहलीला दिली ‘ही’ मोठी भेट

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत विराटने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक यानंही फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये एन्ट्री घेतली आहे.

    आयपीएलच्या२०२१ ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या सामान्यांसाठी सर्व खेळाडू दुबईत दाखल झाले असून विराटच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंज बेंगलुरू (RCB) आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) विराट कोहलीला आनंदाची बातमी दिली. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत विराटने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक यानंही फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये एन्ट्री घेतली आहे.

     

    विराट ७१७ गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे आणि त्यानं डेव्हॉन कॉनवे ( ७००) याला मागे टाकले. लोकेश राहुल ( ६९९) सहाव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा एकही खेळाडू टॉप १०मध्ये नाही.