कोहलीमध्ये सचिनचाच भास होतो- इयान गोल्ड

दिल्ली: विराट कोहलीचा खेळ पाहताना जणू सचिन तेंडुलकरच खेळत आहे, असा भास होतो, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच इयान गोल्ड यांनी कोहलीचे कौतुक केले आहे. जागतिक स्तरावर अनेक दिग्गज फलंदाज

 दिल्ली: विराट कोहलीचा खेळ पाहताना जणू सचिन तेंडुलकरच खेळत आहे, असा भास होतो, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच इयान गोल्ड यांनी कोहलीचे कौतुक केले आहे. जागतिक स्तरावर अनेक दिग्गज फलंदाज पाहिले पण सध्याच्या काळात कोहलीला पर्याय नाही किंवा प्रतिस्पर्धीही नाही. पंच मैदानावर ज्या जागी उभे राहतात त्याला ग्रॅण्ड स्टॅण्ड म्हणतात. या जागेवरून खेळ पाहणे यासारखा आनंद नाही. सचिनच्या अनेक खेळी मी पाहिल्या आहेत, आता कोहली खेळत असतानाही मला सचिनच फलंदाजी करत असल्याचा भास होतो, असेही ते म्हणाले.